व्यवसाय करायची सुवर्ण संधी| प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | mudra loan scheme|
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, (mudra loan yojana) मुद्रा योजनेचे उद्दिष्ट काय आहे, मुद्रा लोन योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वयोमर्यादा काय आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पात्रता काय आहे, प्रधानमंत्री मुद्रा आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
![]() |
| mudra loan yojana |
योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना / mudra loan yojana
योजनेची सुरुवात ८ एप्रिल २०१५
कोणी सुरु केली केंद्र सरकार / नरेंद्र मोदी
योजनेचा उद्देश देशातील लघुउद्योगांना कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे.
लाभार्थी देशातील नागरिक
देशातील लघुउद्योगांना त्यांच्या उद्योगासाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
या योजनेची सुरुवात ८ एप्रिल २०१५ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेसाठी ३ लाख करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली या योजनेअंतर्गत लघु उद्योगांना बँका मार्फत १० लाखाप हैर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
मुद्रा योजनेचा उद्देश
pm mudra loan yojana
छोटे व्यवसाय व लघु उद्योग करणारे तसेच छोटे उत्पादन करणारे उद्योग जसे दुकाने, फळ भाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्रे, इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून देणारी दुकाने, लघुउद्योग, घरगुती अन्नप्रक्रिया, फेरीवाले, सलून, हाताने बनवण्यात येणाऱ्या घरगुती वस्तू, व असंख्य छोटे व्यावसायिक तसेच लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे व बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे हे या मुद्रा लोन योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाची वर्गवारी
Pradhanmantri mudra yojana
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाची वर्गवारीतील 3 प्रकारात करण्यात आली आहे.
1. मुद्रा लोन योजना कर्ज शिशू श्रेणी
या वर्गवारीसाठी ५० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते या दिल्या जाणाऱ्या कर्जावर प्रत्येक महिन्यासाठी ९ टक्के व्याज व वर्षासाठी १२ टक्के व्याजदर आकारला जातो
या श्रेणीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा कालावधी ५ वर्षापर्यंत दिला गेलेला आहे.
2. मुद्रा लोन योजना कर्ज किशोर श्रेणी mudra loan yojana,
या वर्गवारीतील व्यावसायिकांना ५० हजारांपासून ५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
या श्रेणीअंतर्गत व्याजाचा दर बँक निश्चित करते कर्जाचा कालावधी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या नावलौकिकेवर आधारित करण्यात येतो.
3. मुद्रा लोन योजना कर्ज तरुण श्रेणी
या वर्गवारीतील व्यावसायिकांना ५ लाखापासून १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येते.
या वर्गवारीतील व्याजाचा दर बँक निश्चित करते या श्रेणीतील कर्जाचा कालावधी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या नावलौकिकेवर तसेच बँकांच्या धोरणावर अवलंबून असतो.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये
pm mudra yojana Features
या योजनेअंतर्गत देशातील बहुसंख्य उद्योजकांना जे स्वतःचा उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत अशा व्यावसायिकांना वित्त सहाय्य मिळते.
या योजनेअंतर्गत १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते.
या योजनेला केंद्र सरकारची २० हजार कोटींची भक्कम भांडवली पाठबळ आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही. 'mudra loan yojana'
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनाची आवश्यकता नाही.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी उद्योजकास स्वतःकडील १० टक्के सुद्धा भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
ही योजना केवळ सरकारी बँकामध्येच आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय १८वर्षे पूर्ण असायला हवे असे काही नाही.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा कर्जदार इतर कोणत्याही बँकेच्या थकबाकीदार नसावा.
महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे लाभ
Mudra Yojana Benefits
देशांतील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा लघु उद्योग सुरू करायचा आहे तो या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो.
या योजनेअंतर्गत लघुउद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणालाही जामीन ठेवायची गरज नाही.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवायची गरज नाही.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीच Process Fee आकारली जात नाही.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड मुदत ५ वर्षे आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एक मुद्रा कार्ड दिले जाते ज्याच्या मदतीने लाभार्थी त्याला गरज असेल त्यावेळेस पैसे काढू शकतो.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.
documents required for mudra loan
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराचे मतदान ओळखपत्र
- अर्जदाराच्या राहत्या घराचे वीजबिल
- अर्जदार जो व्यवसाय करत आहे किंवा व्यवसाय करणार आहे त्याचा परवाना व पत्ता
- अर्जदाराच्या बँकेचे मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट.
- व्यवसायासाठी विकत घ्यावयाच्या वस्तूचे / मशिनरी इत्यादींचे कोटेशन किंवा बिले.
- अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून यंत्रसामुग्री / वस्तू / माल घेतला असेल त्या व्यापाऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता.
- आयकर/विक्री कर विवरणासह युनिटची मागील दोन वर्षांची ताळेबंद (२ लाख कर्जाच्या वरती लागू)
- अर्ज सादर केल्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात साधलेली विक्री
- अर्जदार हा अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र.
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- राहत्या घराचा पत्ता
- टेलिफोन बिल
- प्रोपर्टी टॅक्स बिल
- मुद्रा कार्ड चा लाभ
mudra card benefits
मुद्रा लोन घेणाऱ्या लाभार्थ्याला मुद्रा कार्ड दिले जाते जे डेबिट कार्ड सारखे असते.
लाभार्थ्याला व्यवसायासाठी जेव्हा जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा तेव्हा तो या मुद्रा कार्ड च्या सहाय्याने पैसे काढू शकतो.
मुद्रा कार्ड सोबत एक पासवर्ड दिला जातो जो पैसे काढताना वापरायचा असतो.
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकांची यादी
mudra yojana bank list
Canara Bank
Central Bank of India
IDBI Bank
Indian Bank
Indian Overseas Bank
United Bank of India
Syndicate Bank
Corporation Bank
Dena Bank
Federal Bank
HDFC Bank
Allahabad Bank
Andhra Bank
Axis Bank
Bank of Baroda
J&K Bank
Karnataka Bank
Kotak Mahindra Bank
Oriental Bank of Commerce
Bank of India
Bank of Maharashtra
Syndicate Bank
शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
pm mudra loan apply
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याला जवळच्या बँकेत जाऊन मुद्रा योजना कर्जाचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा. "mudra loan yojana"
तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून 1 महिन्यानंतर लोन दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
Q 1. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज परत करण्याचा कालावधी किती आहे?
Ans: प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज परत करण्याचा कालावधी ५ वर्षाचा आहे.
Q 2. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाची वर्गवारी किती प्रकारात करण्यात आली आहे?
Ans: प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कागदाची वर्गवारी 3 प्रकारात करण्यात आली आहे.
1. शिशु श्रेणी 2. किशोर श्रेणी 3. तरुण श्रेणी
Q 3. मुद्रा म्हणजे काय?
Ans: भारत सरकार द्वारा स्थापन केलेली ही एक वित्तीय संस्था आहे जी लघुउद्योजकांना वित्त पुरवठा करण्याऱ्या वित्तीय संस्थांना (बँकांना) पुनर्वित्त करून देते.
Q 4. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते?
Ans: प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त दहा लाख रुपये कर्ज मिळू शकते.
निष्कर्ष:-
आशा करतो कि प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले मुद्रा योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


0 Comments